आज दुपारी १ वाजता दहावीचा निकाल जाहीर..

24 प्राईम न्यूज 8 May 2026
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी (एसएससी) परीक्षेचा निकाल आज शुक्रवार (दि. ८ मे) दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

निकालापूर्वी सकाळी ११ वाजता मंडळाची पत्रकार परिषद होणार असून, यामध्ये राज्याचा एकूण निकाल, विभागनिहाय निकाल, उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी तसेच सर्वाधिक निकाल लागलेल्या जिल्ह्याची माहिती जाहीर केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना आपला निकाल
sscresult.mkcl.org�,
mahresult.nic.in�
आणि
mahahsscboard.in�
या संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.
राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळांमार्फत २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.

या परीक्षेसाठी राज्यातील २३ हजार ६८३ शाळांमधून विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये ८ लाख ६५ हजार ७४० विद्यार्थी, ७ लाख ४९ हजार ७३६ विद्यार्थिनी तसेच १५ तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा समावेश होता. राज्यातील ५ हजार १११ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली होती.
