७ महिन्यांपासून सभा नाही; पातोंडा विकास सेवा सहकारी सोसायटीच्या संचालकांची सहाय्यक निबंधकांकडे धाव..

0
New-Doc-03-02-2025-22.23.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : तालुक्यातील पातोंडा येथील वि.का. सेवा सहकारी सोसायटीची मागील सात महिन्यांपासून सभा न झाल्याने संचालकांनी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था अमळनेर यांच्याकडे तात्काळ सभा बोलविण्याची मागणी केली आहे. याबाबत दिनांक ६ मे २०२६ रोजी लेखी निवेदन देण्यात आले.


निवेदनात म्हटले आहे की, सोसायटीची शेवटची सभा २२ सप्टेंबर २०२५ रोजी झाली होती. त्यानंतर सात महिने उलटूनही कोणतीही संचालक बैठक घेण्यात आलेली नाही. चेअरमन व सचिव यांच्याशी वारंवार प्रत्यक्ष व दूरध्वनीद्वारे संपर्क साधूनही त्यांनी बैठकीबाबत टाळाटाळ केल्याचा आरोप संचालकांनी केला आहे. सध्या चेअरमन यांचा फोन बंद लागत असून सचिव फोन उचलत नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम व सोसायटीच्या उपविधीनुसार नियमित सभा घेणे बंधनकारक असताना सभा न झाल्याने अनेक महत्त्वाचे विषय प्रलंबित असल्याचे संचालकांनी म्हटले आहे. यात २०२५ च्या लेखापरीक्षण अहवालास मंजुरी, कामकाजाचा अहवाल सादर करणे, २०२६ आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मंजूर करणे, सभासदांच्या तक्रारी ऐकणे, कर्ज प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविणे, शेतकऱ्यांसाठी एटीएम सुविधा सुरू करणे, सचिवपदाची नवीन नियुक्ती तसेच कर्ज वाटपासाठी सह्यांचे अधिकार देणे आदी विषयांचा समावेश आहे.
अर्ज प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसांच्या आत सभेची नोटीस काढावी, अन्यथा जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जळगाव येथे तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशाराही संचालकांनी दिला आहे.
या निवेदनावर भरत देवाजी पाटील, मधुकर सुकलाल चौधरी, किशोर राजाराम पाटील, संभाजी विक्रम पाटील, कैलास लहू पाटील आणि राहुल वसंत लांबोळे यांच्या सह्या आहेत.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 151000

22 Ct सोने 91.60% : ₹. 139700

18 Ct सोने 75.00% : ₹. 116300

शुद्ध चांदी 999%:₹. 2530/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed