पातोंडा येथे उष्माघाताचा बळी; शेतमजुराचा कामादरम्यान मृत्यू..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : तालुक्यातील पातोंडा येथे शेतात काम करत असताना उष्माघाताने एका तरुण शेतमजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. रघुनाथ वाल्हे असे मृत मजुराचे नाव आहे.

रघुनाथ वाल्हे हे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. हाताला मिळेल ते काम करून ते कुटुंबाचा गाडा चालवत होते.

सध्या ते धान्य काढणीच्या मशीनवर मजुरीचे काम करत होते.
मंगळवारी दुपारी पातोंडा परिसरातील शेतकरी देविदास पाटील यांच्या शेतात बाजरी काढणीचे काम सुरू असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. उष्णतेचा तीव्र तडाखा बसल्याने त्यांना उष्माघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व मुली असा परिवार असून, घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. शासनाने वाल्हे कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 151000
22 Ct सोने 91.60% : ₹. 139700
18 Ct सोने 75.00% : ₹. 116300
शुद्ध चांदी 999%:₹. 2530/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
