भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला धडक ; दहावीतील विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू..

0
New-Doc-05-07-2026-06.37.jpg


अमळनेर : तालुक्यातील हेडावे गावाजवळ भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार अल्पवयीन तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


ढेकू येथील संचित राजेंद्र पाटील (वय १५) हा इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत होता. त्याच्या पाळीव बकरीला कुत्र्याने चावा घेतल्याने औषध आणण्यासाठी तो मोटरसायकलवरून अमळनेर येथे गेला होता.

औषध घेऊन गावाकडे परतत असताना हेडावे गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात संचितच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, उदय बोरसे, सुनील पाटील, हेडकॉन्स्टेबल कुमावत तसेच यश सपकाळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
अपघातग्रस्त ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे ढेकू गावात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 151000

22 Ct सोने 91.60% : ₹. 139700

18 Ct सोने 75.00% : ₹. 116300

शुद्ध चांदी 999%:₹. 2530/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed