साखरपुड्याचे थेट निकाहमध्ये रूपांतर; अमळनेरात अनोखा विवाह सोहळा चर्चेत..

0
New-Doc-05-06-2026-06.54.jpg


आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : शहरात एका अनोख्या आणि सकारात्मक घडामोडीमुळे विवाह सोहळ्याची चर्चा रंगली आहे. येथील शकील सलीम खाटीक यांची कन्या गुलअफशा बी हिचा साखरपुडा मालेगाव येथील अल्ताफ अहमद शेख बशीर खाटीक यांचा मुलगा हमजाह याच्यासोबत ठरला होता.


दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी अमळनेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे साखरपुड्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला दोन्ही कुटुंबीय, नातेवाईक तसेच खाटीक समाजातील मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.


कार्यक्रम सुरू असतानाच समाजातील पंच मंडळी, दोन्ही कुटुंबीय आणि उपस्थितांमध्ये चर्चा झाली. या चर्चेतून सर्वांच्या एकमताने साखरपुड्याचा कार्यक्रम थेट निकाह सोहळ्यात रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. निर्णयानंतर तात्काळ निकाहची धार्मिक विधी पार पाडण्यात आली.
या अनपेक्षित पण आनंददायी निर्णयामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. एकाच दिवशी साखरपुडा आणि विवाह सोहळा पार पडल्याने वेळ आणि खर्चाची बचत झाली, तसेच परंपरा आणि आधुनिकतेचा समन्वय साधणारा हा उपक्रम ठरला.
अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे हा अनोखा निकाह सोहळा शहरात चर्चेचा विषय ठरला असून, सामाजिक एकोपा आणि परस्पर समजुतीचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 148500

22 Ct सोने 91.60% : ₹. 137000

18 Ct सोने 75.00% : ₹. 114000

शुद्ध चांदी 999%:₹. 2450/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed