अमळनेर तालुक्यात आदिवासी क्रांती दलाची ताकद वाढली; गांधली व देवगाव देवळी येथे फलक अनावरण उत्साहात..
आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर : आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि घटनात्मक हक्कांच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या ‘आदिवासी क्रांती दल’ संघटनेने अमळनेर तालुक्यात आपला प्रभाव अधिक मजबूत केला आहे. संघटनेच्या वतीने गांधली तसेच देवगाव देवळी येथे फलक अनावरण व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. बाबासाहेब बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी आदिवासी समाज आजही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असल्याचे सांगत, शासनाच्या विविध योजनांची माहिती समाजापर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या हक्कांसाठी लढा उभारणे हे संघटनेचे प्रमुख ध्येय असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी उमाताई भिल, पत्रकार प्रवीण बैसाणे आणि माजी मुख्याध्यापक एस. बी. बैसाणे यांनी मार्गदर्शन करताना आदिवासी समाजाने शिक्षण, रोजगार व व्यवसायाच्या क्षेत्रात पुढे येऊन स्वावलंबी बनावे, असे आवाहन केले.
गांधली येथील कार्यक्रमात शाखाध्यक्ष सतीश पारधी यांनी पुढाकार घेतला, तर देवगाव देवळी येथील कार्यक्रम शाखाध्यक्ष सुरेशभाऊ भिल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. दोन्ही ठिकाणी आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून संघटनेच्या कार्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गांधली येथे सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मुकेशभाऊ नेतकर, रमेशभाऊ पवार, स्वामीभाऊ कोळी, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब दाभाडे, संतोषभाऊ संदानशिव, दयाराम मोरे, विनोद मोरे, प्रकाशभाऊ सोनवणे, सुदाम वाघ, कविता पवार, बबलू पवार, कल्याणी दाभाडे, कविता मोरे, गणपत दाभाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष आप्पासाहेब दाभाडे व सर्व शाखाध्यक्षांनी विशेष परिश्रम घेतले. आगामी काळात संपूर्ण तालुक्यात संघटनात्मक दौरे राबवून आदिवासी समाजाला संघटित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 148500
22 Ct सोने 91.60% : ₹. 137000
18 Ct सोने 75.00% : ₹. 114000
शुद्ध चांदी 999%:₹. 2450/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
