अमळनेरमध्ये लोकसंघर्ष मोर्चाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचित घटकांच्या २२ मागण्यांकडे लक्ष वेधले.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी तसेच वंचित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न आणि समस्यांबाबत हे निवेदन तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

या निवेदनात विविध २२ विषयांचा समावेश असून, दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी आणि समाजातील वंचित घटकांना न्याय मिळावा, त्यांच्या मूलभूत समस्या सोडविण्यात याव्यात तसेच शासनाने त्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी लोकसंघर्ष मोर्चाचे पन्नालाल मावळे, निलाबाई भिल, आनंद पवार, शरद पाटील, शंकर भिल, गणेश माळी, राजेंद्र पारधी, मधुकर चव्हाण, गणेश पारधी, संजय बारेला, जयदेव पारधी, शांताराम पारधी, हेमंत दाभाडे, भुरा पारधी, धनराज पारधी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

