महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या अमळनेर तालुका कार्यकारिणीची घोषणा अध्यक्षपदी अशोक पाटील, सरचिटणीसपदी विजय पाटील यांची सर्वानुमते निवड.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (संभाजीराव गट) यांच्या अमळनेर तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, तालुकाध्यक्षपदी अशोक रघुनाथ पाटील, तर सरचिटणीसपदी विजय आनंदा पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष जयवंतराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी राजू देवचंद पाटील, ग.स.चे माजी अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष विलासराव नेरकर, जिल्हा संघाचे नेते व उपाध्यक्ष वाल्मिक मराठे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष विलास नेरकर यांनी नूतन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली.

बैठकीत तालुक्यातील शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी संघटना आक्रमक व आग्रही भूमिका घेणार असल्याचे निश्चित करण्यात आले. तसेच तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांना विश्वासात घेऊन एकत्रितपणे शिक्षकांच्या हितासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी एन. आर. पाटील यांनी बैठकीला उपस्थित राहून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष – अशोक रघुनाथ पाटील, सरचिटणीस – विजय आनंदा पाटील, कार्याध्यक्ष – राहुल भगवान सोनवणे, कोषाध्यक्ष – समाधान खैरनार.
उपाध्यक्ष – योगेश्वर भाऊराव पाटील, दत्तात्रय बारकू सोनवणे, हिंमत चौधरी, ज्ञानेश्वर कुवर.
सहसचिव – हिरालाल धर्मा सैंदाणे, योगेश भदाणे, प्रीतम रत्नपारखी.
ज्येष्ठ मार्गदर्शक – जगदीश भटू पाटील, किशोर देसले, रियाज शेख, रवींद्र प्रभाकर पाटील.
तंत्रस्नेही मार्गदर्शक – सुधाकर पाटील, शंकर बोरसे, नामदेव अहिरे, संदीप सूर्यवंशी, भरत जाधव, निलेश मोतीलाल पाटील.
संघटक – विजय बिर्हाडे, सुनील देवरे, जिजाबराव पाटील, हेमंत शिंदे, विलास मोरे, प्रशांत पाटील, कमलेश मोरे, कुणाल पोतदार, सुधीर पाटील, संदीप गुलाबराव पाटील, राजेंद्र संभाजीराव पाटील व अरुण पवार.
या बैठकीला माजी सरचिटणीस मोहन ताडे, भटू आप्पा शिरसाठ, अमळनेर तालुका शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकर चौधरी, प्राथमिक शिक्षक संघ (शिवाजीराव गट) अध्यक्ष संदीप वाघ, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुणाल पवार यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच ज्येष्ठ केंद्रप्रमुख किरण शिसोदे, शरद सोनवणे, चंद्रकांत साळुंखे, वाल्मिक भदाणे, महेश पाटील, सचिन पाटील व ग्रेडेड मुख्याध्यापक छगन पाटील यांची उपस्थिती होती. बैठकीला मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते. नूतन कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

