पळासदडे येथे चाऱ्याच्या गोठ्याला आग; अग्निशमन दलाने आगीवर मिळवले नियंत्रण… अग्नीशमन विभाग प्रमुख गणेश गोसावी यांच्या आदेशाने चालक जाफर पठाण, फायरमन आकाश संदानशिव व लखन कंखरे यांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर मिळवले नियंत्रण…
अमळनेर/आबिद शेख

पळासदडे : येथील किशोर निंबा पाटील यांच्या चाऱ्याच्या गोठ्याला आज दुपारी ३.५५ वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती पोलीस पाटील संजय बाबुराव पाटील यांनी दूरध्वनीद्वारे अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांच्या आदेशानुसार अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. पथकाने अथक प्रयत्न करून गोठ्यातील संपूर्ण आग विझवली.

या आग नियंत्रण मोहिमेसाठी अग्निशमन दलाचे वाहनचालक जाफर पठाण, फायरमन आकाश संदानशिव आणि लखन कंखरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. वेळेवर मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने तातडीने कार्यवाही करत आग आटोक्यात आणली.

या आगीत चाऱ्याचे किती नुकसान झाले, तसेच आगीचे नेमके कारण काय होते, याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

