अमळनेरमध्ये ११ हजार झाडांसाठी झुंज; ‘साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान’ची मदतीसाठी भावनिक हाक..
आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर : “खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे” या विचाराने प्रेरित होऊन कार्यरत असलेल्या साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान अमळनेर या संस्थेने पर्यावरण संवर्धनासाठी उभारलेला उपक्रम सध्या गंभीर आव्हानांना सामोरा जात आहे. लोकसहभागातून खरेदी केलेल्या तब्बल १३ एकर परिसरात संस्थेने ११ हजार झाडे लावून ती जपण्याचे मोठे काम हाती घेतले आहे.

संस्था २००७ पासून कार्यरत असून 12A व 80G मान्यता प्राप्त आहे. प्रबोधन, संस्कार आणि पर्यावरण संवर्धन या तत्त्वांवर आधारित कामामुळे संस्थेला समाजाचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, गेल्या काही काळात कंपाउंड नसल्यामुळे परिसरात आग लावणे, झाडांची तोड आणि चोरी यांसारखे प्रकार घडले. तरीही संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हार न मानता आपले काम सुरूच ठेवले आहे.

सध्या वाढत्या उन्हामुळे झाडे वाचवणे मोठे आव्हान बनले आहे. पाण्याअभावी झाडे सुकू नयेत यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून एका टँकरचा खर्च सुमारे ८०० रुपये येत आहे. ही आर्थिक जबाबदारी पेलणे संस्थेसाठी कठीण होत असून त्यांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे.
“आज एक झाड वाचेल, तर उद्या आपले भविष्य वाचेल,” असा संदेश देत संस्थेने नागरिकांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. स्वतः मदत करण्याबरोबरच हा संदेश सोशल मीडियावर प्रसारित करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
संस्थेने स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक खात्यात पैसे जमा करू नयेत. अधिक माहितीसाठी ९०७५५७०५१० या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा अधिकृत UPI आयडीद्वारे मदत करावी.पर्यावरणाचे रक्षण आणि भविष्यासाठी हरित वारसा जपण्याच्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवण्याची गरज व्यक्त होत आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 148500
22 Ct सोने 91.60% : ₹. 137400
18 Ct सोने 75.00% : ₹. 114300
शुद्ध चांदी 999%:₹. 2470/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
