टिपू सुलतान पुण्यतिथीनिमित्त नंदुरबारमध्ये पाणपोई व ताक वाटप उपक्रम..
24 प्राईम न्यूज 5 May 2026
नंदुरबार – इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने महान स्वातंत्र्यसेनानी हजरत फतेहअली उर्फ शहीद टिपू सुलतान यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरात सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. धुळे चौफुली परिसरातील हजरत शेरे अबुल गाजी दर्गाजवळ पाणपोईचे उद्घाटन तसेच नागरिकांसाठी ताक वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक व राज्याध्यक्ष एजाज बागवान यांच्या हस्ते झाले.

उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन तहानलेल्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला. पाणपोईमुळे प्रवासी व स्थानिक नागरिकांना दिलासा मिळत असून उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

कार्यक्रमाची सुरुवात हजरत शेरे अबुल गाजी दर्गा येथे फुलांची चादर अर्पण करून प्रार्थनेने करण्यात आली. हा परिसर धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असून येथे सर्वधर्मीय भाविकांची वर्दळ असते. तसेच धुळे चौफुली हा गजबजलेला भाग असल्याने दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिकांची ये-जा होत असते.
इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनतर्फे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून पाणपोई सेवा ही त्याचाच एक भाग आहे. यावेळी ऍड. मजहर शेख, जाकीर बागवान, नासीर बागवान, हाजी अस्लम चौधरी, सय्यद मकसुद, शब्बीर शेख, इरफान खाटीक, जावीद अहमद, युनुस पटेल, जफर काझी, महेमुद सिकलीकर, फारुख मन्यार, जैद शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
