भुसावळ नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांची निवड रद्द; जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने शासनाचा मोठा निर्णय..
24 प्राईम न्यूज 5 May 2026
भुसावळ : महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेत भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष श्रीमती गायत्री रुपचंद गौर ऊर्फ गायत्री चेतन भंगाळे यांची निवड रद्दबातल ठरवली आहे.

त्यांच्या अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील जात प्रमाणपत्राला जात पडताळणी समितीने “अवैध” घोषित केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
४ मे २०२६ रोजी मंत्रालयातून काढण्यात आलेल्या शासन आदेशानुसार, जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने २३ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या आदेशात श्रीमती भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अमान्य ठरवले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी, जळगाव यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.

यावर विचार करून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम १६ (१क) (ब) नुसार शासनाने श्रीमती भंगाळे यांची नगराध्यक्ष पदाची निवड २३ एप्रिल २०२६ पासून भूतलक्षी प्रभावाने रद्द केली आहे. यासोबतच त्यांना नगरसेवक व नगराध्यक्ष या दोन्ही पदांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.
या निर्णयामुळे भुसावळ नगरपरिषदेतील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता असून, नगराध्यक्ष पद आता रिक्त झाले आहे. आगामी काळात या पदासाठी नव्या निवड प्रक्रियेची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून, डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, स्थानिक राजकारणात याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 148500
22 Ct सोने 91.60% : ₹. 137400
18 Ct सोने 75.00% : ₹. 114300
शुद्ध चांदी 999%:₹. 2470/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
