जय योगेश्वर विद्यालयाचा बारावी निकाल ९९% ; उज्वल यशाची परंपरा कायम..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : येथील जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने एचएससी बोर्ड परीक्षा मार्च २०२६ मध्ये ९९ टक्के निकालाची भक्कम नोंद करत तालुक्यातील उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.

या परीक्षेसाठी कला व विज्ञान शाखेतून एकूण ७४८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी बहुतांश विद्यार्थी यशस्वी ठरले असून संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
विज्ञान शाखेतील गुणवत्ता यादी
इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत कु. सार्थक रितेश मगर हिने ९०% गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला. कु. अनुष्का सोपान पाटील (८९%) हिने द्वितीय, तर कु. देवयानी चंद्रकांत पाटील (८८.८३%) हिने तृतीय क्रमांक पटकावला.

कला शाखेतील गुणवत्ता यादी
कला शाखेत कु. निराली पोपट गव्हाणे (८६.८३%) प्रथम आली. उजैफ खान फारुख खान पठाण (८१.३३%) द्वितीय, तर कु. जिया कुवरसिंग तेली (८०.८३%) तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब डी. डी. पाटील, उपाध्यक्ष रावसाहेब के. डी. पाटील, खजिनदार शैलेंद्र दत्तात्रेय पाटील, संचालक नंदकुमार डी. पाटील, संचालिका डॉ. नयना कैलास पाटील तसेच सर्व संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब के. डी. पाटील, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. पी. डी. पाटील आणि कला व विज्ञान विभागातील सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याचे सांगण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 149900
22 Ct सोने 91.60% : ₹. 138600
18 Ct सोने 75.00% : ₹. 115400
शुद्ध चांदी 999%:₹. 2520/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
