अमळनेरात पेट्रोल-डिझेल तुटवडा; ‘आर.के. पंप’वर मोठ्या टँक मध्येच इंधन, बाटलीत देण्यास नकार..
अमळनेर /आबिद शेख
अमळनेर शहरात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अनेक पंपांवर इंधन उपलब्ध नसल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ‘आर. के. पंप’वर इंधन वितरणाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पंपावर गाड्यांच्या मागील बाजूस बसवलेल्या मोठ्या टँकमध्येच पेट्रोल-डिझेल दिले जात असून, बाटलीत किंवा कमी प्रमाणात (उदा. १ लिटर) इंधन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यावरून पंप कर्मचाऱ्यांशी नागरिकांचे वारंवार वाद होत असल्याचेही समोर आले आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, गरजेपेक्षा जास्त प्रमाणात इंधन भरून दिल्यामुळे काही मोजक्या वाहनधारकांकडे साठा जमा होत आहे, तर इतरांना इंधनासाठी वंचित राहावे लागत आहे. परिणामी शहरात कृत्रिम तुटवडा निर्माण होत असून सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

शहरात अनेक ठिकाणी वाहनचालकांना पेट्रोल न मिळाल्याने गाड्या ढकलत एका पंपावरून दुसऱ्या पंपावर फिरताना पाहायला मिळत आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन इंधन वितरणात पारदर्शकता आणावी, सर्वांना समान प्रमाणात इंधन मिळेल याची व्यवस्था करावी, तसेच बाटलीत इंधन देण्याबाबत स्पष्ट नियमांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 149900
22 Ct सोने 91.60% : ₹. 138600
18 Ct सोने 75.00% : ₹. 115400
शुद्ध चांदी 999%:₹. 2520/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
