अमळनेर भाजप युवा मोर्चात नवचैतन्य; शहर व ग्रामीण अध्यक्षांची घोषणा..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या संघटनात्मक बळकटीसाठी अमळनेर येथे खासदार स्मिताताई वाघ यांच्या उपस्थितीत शहर व ग्रामीण मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्यांची घोषणा उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. या नव्या नेतृत्वामुळे शहरासह ग्रामीण भागातील संघटनाला नवी दिशा आणि गती मिळणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

यावेळी अमळनेर शहर भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी राहुल मगन चौधरी यांची निवड जाहीर करण्यात आली. जानवे मंडल अध्यक्षपदी हिरालाल आनंदा पाटील, तर पातोडा मंडल अध्यक्षपदी निखिल रमेश धनगर यांची नियुक्ती करण्यात आली.
नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे युवा मोर्चात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संघटन विस्ताराला अधिक वेग मिळेल, अशी प्रतिक्रिया उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिली.

युवकांनी समाजहित, राष्ट्रहित आणि जनकल्याणाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेत पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रदेश चिटणीस सौ. भैरवी वाघ पलांडे, जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, जानवे मंडल अध्यक्ष जिजाबराव पाटील, पातोडा मंडल अध्यक्ष राहुल पाटील, शहराध्यक्ष योगेश महाजन यांच्यासह व्ही. आर. पाटील, लालचंद सैनानी, महेंद्र पाटील, श्रीनिवास मोरे, डॉ. अनिल शिंदे, महेशराव पाटील, श्याम अहिरे, भिकेश पाटील, नगरसेवक विजय राजपूत, भरत परदेशी, तुळशीराम हटकर, बाळू पाटील, श्याम पाटील, संदीप पाटील, राकेश पाटील, संजय पाटील, घनश्याम पाटील, विजय पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत सर्वांनी पक्षविस्तारासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 149900
22 Ct सोने 91.60% : ₹. 138600
18 Ct सोने 75.00% : ₹. 115400
शुद्ध चांदी 999%:₹. 2520/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
