अमळनेर-जळोद बससेवेची मागणी; विद्यार्थ्यांच्या अडचणींमुळे मनसेचे आंदोलनाचा इशारा..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – तालुक्यातील अमळगाव गांधीली येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना वाहतुकीच्या सुविधेअभावी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः लासूर बस त्या ठिकाणी थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचणे कठीण होत असून सध्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.

या पार्श्वभूमीवर अमळनेर ते जळोद तसेच अमळगाव गांधीली मार्गावर बससेवा सुरू करण्याची मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मा. आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले. निवेदनात सकाळी ८ वाजता अमळनेर ते जळोद ही विशेष बस सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, मागणी तातडीने पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदन देताना तालुका अध्यक्ष संदीप पाटील (काटे), शहराध्यक्ष धनंजय साळुंखे, शहर उपाध्यक्ष महेश सुतार, तालुका उपाध्यक्ष निलेश चौधरी, तालुका सचिव निलेश भावसार, शहर उपाध्यक्ष आदित्य दोरकर, जय बोरसे तसेच मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 149900
22 Ct सोने 91.60% : ₹. 138600
18 Ct सोने 75.00% : ₹. 115400
शुद्ध चांदी 999%:₹. 2520/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
