अमळनेरमध्ये अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन..

0
New-Doc-05-03-2026-06.17.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – धरणगाव रस्त्यावरील मंगलेश्वर नगर, ताडेपुरा परिसरात असलेल्या गिरीश शांताराम कुंभार यांच्या वीट भट्टीमध्ये एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मृत पुरुष अंदाजे 55 ते 60 वर्षे वयोगटातील असून त्याचा बांधा सळपातळ आहे. त्याने अंगात पिवळ्या रंगाचा चौकोनी नक्षी असलेला शर्ट व पायात काळ्या रंगाची स्पोर्ट पॅन्ट परिधान केलेली आहे. त्याचे केस व दाढी पांढऱ्या रंगाची असल्याचे पोलिसांनी सांगितले.


सदर अनोळखी पुरुषाचा मृतदेह सध्या ग्रामीण रुग्णालय, अमळनेर येथील शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला आहे. मृताची ओळख अद्याप पटलेली नसून, त्याची माहिती मिळविण्यासाठी अमळनेर पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
या व्यक्तीची ओळख कोणाला पटत असल्यास त्यांनी तात्काळ अमळनेर पोलीस स्टेशन (फोन: 02587 223333) किंवा पोलीस कर्मचारी उदय बोरसे (मो. 9975696264) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed