अमळनेरहून अजमेरशरीफ साठी नवी रेल्वे सेवा सुरू — यात्रेकरूंना मोठा दिलासा.

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : अमळनेर व परिसरातील अजमेर शरीफ दर्ग्यावर जाणाऱ्या यात्रेकरूंकरिता आनंदाची बातमी समोर आली आहे. हिसार–काकीनाडा एक्सप्रेस ही रेल्वे आता अजमेर शरीफसाठी सोयीस्कर सेवा देणार असून ही नवी सुविधा 13 मे 2026 पासून सुरू होणार आहे.

नवीन वेळापत्रकानुसार, ही गाडी प्रत्येक बुधवारी सकाळी 9:54 वाजता अमळनेर रेल्वे स्थानकावर येईल व तेथून सुटून गुरुवारी पहाटे 4 वाजता अजमेर शरीफ येथे पोहोचेल.
परतीच्या प्रवासासाठी हीच गाडी शुक्रवारी रात्री 11:20 वाजता अजमेर शरीफहून सुटेल आणि शनिवारी दुपारी 4:30 वाजता अमळनेर येथे पोहोचेल.
या नव्या रेल्वे सेवेचा फायदा अमळनेर व आजूबाजूच्या भागातील हजारो यात्रेकरूंना होणार असून अजमेर शरीफ दर्ग्याच्या दर्शनासाठी प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. ही सेवा भाविकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
अमळनेर रेल्वे प्रवासी मंच अध्यक्ष : डॉ. इम्रान अली शाह सचिव अशफाक शेख यांनी माहिती दिली
