५ वीच्या निकालात आरा शहाची झळाळती कामगिरी; 90% गुणांसह प्रथम क्रमांक..

0
New-Doc-04-30-2026-09.43.jpg

आबिद शेख /अमळनेर
अमळनेर : पीबीए इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता पाचवीचा वार्षिक निकाल नुकताच जाहीर झाला असून, यंदाच्या निकालात आरा अक्षय शहा हिने 90% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळेचा गौरव वाढला असून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.


आरा हिने लहान वयातच मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. नियमित अभ्यास, वेळेचे योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन या गुणांमुळेच तिने उत्कृष्ट कामगिरी करत अव्वल स्थान मिळवले. तिच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत आहे.
तिच्या या यशाबद्दल शाळेतील शिक्षिका शेख मॅडम, जयश्री मॅडम आणि बोरोले मॅडम यांनी विशेष अभिनंदन केले. तसेच मुख्याध्यापक जे. एस. देवरे सर आणि व्हॉइस प्रिन्सिपल बारी मॅडम यांनीही तिच्या मेहनतीचे कौतुक करत पुढील

वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ट्युशन शिक्षिका नूतन मॅडम यांनीही तिच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
आरा ही व्यावसायिक अक्षय शहा यांची कन्या असून, तिच्या या यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. कुटुंबाचा पाठिंबा आणि प्रोत्साहन तिच्या यशामागे महत्त्वाचा घटक ठरला आहे.
आरा शहाचे हे यश तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पायाभरणी ठरत असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed