गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; १५७ सिलेंडर्ससह तिघे अटकेत..
24 प्राईम न्यूज 30 एप्रिल 2026
जिल्ह्यातील फैजपूर आणि वरणगाव परिसरात गॅस एजन्सींची गोदामे फोडून सिलेंडर्स चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून,

त्यांच्याकडून एकूण ४ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फैजपूर येथील श्रीधर गॅस एजन्सीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ३ लाख ११ हजार ८०० रुपये किमतीचे १०० भरलेले गॅस सिलेंडर्स चोरून नेले होते. याप्रकरणी ललीत रघुनाथ राणे यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर वरणगाव येथेही नरेंद्र अहिरे यांच्या गॅस गोदामातून ५७ सिलेंडर्स चोरीला गेल्याची घटना समोर आली होती.

एकापाठोपाठ घडलेल्या या चोरीच्या घटनांमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला. तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे संशयित वाहनांचा मागोवा घेण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी
शेख बिलाल शेख नबी (वय ३२, रा. कासोदा, ता. एरंडोल)
वसीम खान शाबीर खान (वय ३१, रा. तांबापुरा, जळगाव)
चेतन सुरेश काळे (वय ३८, रा. नशिराबाद, ता. भुसावळ)
या तिघांना ताब्यात घेतले. पोलिसी चौकशीत आरोपींनी इतर साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली.
जप्त मुद्देमाल :
६२ भरलेले गॅस सिलेंडर्स (किंमत अंदाजे ₹१.५५ लाख)
९५ रिकामे गॅस सिलेंडर्स (किंमत अंदाजे ₹१.४२ लाख)
सुझुकी बर्गमन मोपेड (किंमत ₹१.३० लाख)
असा एकूण १५७ सिलेंडर्ससह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय मैनुद्दीन सैय्यद आणि विनोद गाभणे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर व केदार वारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 148400
22 Ct सोने 91.60% : ₹. 136500
18 Ct सोने 75.00% : ₹. 112800
शुद्ध चांदी 999%:₹. 2430/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
