अमळनेरात तहानलेल्या पक्षी व झाडांसाठी पाणी उपक्रम; नागरिकांना मदतीचे आवाहन..

0
New-Doc-04-29-2026-11.28.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पक्षी व झाडे तहानलेली असून त्यांच्या संरक्षणासाठी अमळनेर येथील साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान यांच्या वतीने स्तुत्य पाणी उपक्रम राबविण्यात येत आहे. “आपलं कर्तव्य म्हणा किंवा मानवता, किंवा पुण्य” या भावनेतून नागरिकांनी पुढे येत मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


या उपक्रमांतर्गत झाडांना व पक्ष्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार असून एका पाणी टँकरसाठी सुमारे ८०० रुपये खर्च येत आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी लोकसहभागातून पुढे येत या उपक्रमात आर्थिक मदत करावी, असे आवाहन संस्थेने केले आहे.


“लोकसहभागातूनच पर्यावरण संवर्धन शक्य आहे. प्रत्येकाने आपल्या परीने योगदान दिल्यास अधिक झाडे व पक्ष्यांचे प्राण वाचू शकतात,” असा विश्वासही आयोजकांनी व्यक्त केला आहे. नागरिकांनी स्वतः मदत करण्याबरोबरच आपल्या मित्र-नातेवाईकांनाही यासाठी प्रोत्साहित करावे, तसेच सोशल मीडियावर हा संदेश शेअर करून जनजागृती करावी, असेही सांगण्यात आले.
देणगी दिल्यानंतर पावतीसाठी आपले नाव, पत्ता व मोबाईल क्रमांकासह स्क्रीनशॉट पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९०७५५७०५१० या क्रमांकावर संपर्क साधावा.
या उपक्रमाला अमळनेरकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 149200

22 Ct सोने 91.60% : ₹. 137300

18 Ct सोने 75.00% : ₹. 113500

शुद्ध चांदी 999%:₹. 2420/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed