ड्रग्ज माफियावर मोठा घाव! दाऊदचा साथीदार सलीम डोला इस्तंबूलहून भारतात..
24 प्राईम न्यूज 29 एप्रिल 2026
मुंबई : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटशी संबंधित आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय मानला जाणारा सलीम डोला याला भारतात आणण्यात तपास यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. तुर्कीयेतील इस्तंबूल येथे अटक करण्यात आल्यानंतर मंगळवारी पहाटे विशेष विमानाने त्याला भारतात आणण्यात आले.

भारतीय तपास यंत्रणांनी सोमवारी इस्तंबूलमध्ये कारवाई करत डोलाला ताब्यात घेतले होते. तुर्की सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने आणि भारतीय गुप्तचर विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे त्याचे प्रत्यार्पण शक्य झाले. डी-कंपनीच्या ड्रग्ज नेटवर्कसाठी ही मोठी धडक मानली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सलीम डोला गेल्या अनेक वर्षांपासून आखाती देश आणि युरोपमधून ड्रग्ज तस्करीचे जाळे चालवत होता. या अवैध व्यवसायाची उलाढाल तब्बल ५ हजार कोटी रुपयांहून अधिक असल्याचा अंदाज आहे. भारतातील विविध शहरांत ड्रग्ज निर्मिती केंद्रे उभारून तरुणांना नशेच्या विळख्यात ओढण्याचे काम तो करत होता.
ड्रग्ज तस्करीसोबतच हवाला व्यवहार आणि दहशतवादी निधी पुरवठ्यातही त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे तपासात समोर येत आहे. सध्या त्याला दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले असून गुप्तचर यंत्रणांकडून सखोल चौकशी सुरू आहे.
प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर सलीम डोलाला अमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (NCB) किंवा मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात येण्याची शक्यता आहे. मुंबईत त्याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने पुढील काही दिवसांत न्यायालयीन प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तपास यंत्रणांच्या मते, सलीम डोलाची अटक ही डी-कंपनीच्या अमली पदार्थ नेटवर्कसाठी मोठा धक्का ठरणार असून, यामुळे भविष्यात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 149200
22 Ct सोने 91.60% : ₹. 137300
18 Ct सोने 75.00% : ₹. 113500
शुद्ध चांदी 999%:₹. 2420/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
