तहसिलदारांच्या नावाने ५० हजारांची लाच मागणी; २५ हजार स्वीकारताना आरोपी रंगेहात पकडले..

0
New-Doc-04-28-2026-23.23.jpg


आबिद शेख/ अमळनेर
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अमळनेर तालुक्यात मोठी कारवाई करत दोन खासगी इसमांना लाचेच्या प्रकरणात रंगेहात पकडले आहे. तहसिलदार यांच्या नावाने ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.


मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे गौण खनिज वाहतुकीचा व्यवसाय करतात. त्यांना मौजे मांडळ येथील पांझरा नदीतून वाळू वाहतूक करण्यासाठी दोन ट्रॅक्टरना परवानगी देण्यासाठी आरोपी रामराव हरचंद पाटील (वय ६४, रा. लोणपंचम) व जितेंद्र राजेंद्र पाटील (वय २६, रा. झाडी, ता. अमळनेर) यांनी तहसिलदार यांच्या नावाने प्रती ट्रॅक्टर २५ हजार रुपये, अशा एकूण ५० हजार रुपयांची लाच मागितली होती.


याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे तक्रार दाखल केली. दि. २८ एप्रिल रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर सापळा रचून आज कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान जितेंद्र पाटील यांनी एका ट्रॅक्टरचे २५ हजार रुपये पंचांसमक्ष स्वीकारले. त्याचवेळी दोन्ही आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईतील अधिकारी व पथक :
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल यांनी सापळा अधिकारी म्हणून पार पाडली. तपास पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे करत आहेत. पथकात राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, मकरंद पाटील, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, चंद्रकांत सैंदाणे, रेश्मा परदेशी, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांचा समावेश होता.
नागरिकांना आवाहन :
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय किंवा निमशासकीय अधिकारी/कर्मचारी अथवा खाजगी व्यक्ती कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास तत्काळ धुळे येथील ACB कार्यालयाशी संपर्क साधावा.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 149200

22 Ct सोने 91.60% : ₹. 137300

18 Ct सोने 75.00% : ₹. 113500

शुद्ध चांदी 999%:₹. 2420/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed