पातोंडा–सावखेडा रस्त्यावर वाळूमुळे भीषण अपघात; चार महिन्यांच्या बाळासह संपूर्ण कुटुंब गंभीर जखमी, प्रशासन सुस्त.

0
New-Doc-04-28-2026-06.54.jpg


आबिद शेख/अमळनेर
पातोंडा ते सावखेडा या मार्गावर रस्त्यावर साचलेल्या वाळूमुळे आणखी एक भीषण अपघात घडला असून एका बाईकस्वारासह त्याचे संपूर्ण कुटुंब गंभीर जखमी झाले आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाळू साचलेली असल्याने संबंधित बाईक घसरली आणि अपघात झाला. या अपघातात बाईकस्वारासह त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्य जखमी झाले आहेत. विशेषतः अवघ्या चार महिन्यांच्या बाळाच्या डोक्यात दगड घुसून छिद्र पडल्याने त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे समजते.


तसेच २ ते ५ वर्षे वयोगटातील लहान मुलेही या अपघातात जखमी झाली असून सर्व जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या रस्त्यावर डंपर व ट्रॅक्टरमधून होणाऱ्या वाळू वाहतुकीदरम्यान वाळू रस्त्यावर टाकून चालक पळ काढत असल्याच्या तक्रारी वारंवार होत आहेत. परिणामी रस्त्यावर वाळूचा थर साचून वाहन घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. यापूर्वीही अनेक अपघात घडूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, रस्त्यावर साचलेल्या वाळूचा तहसील प्रशासनाकडून पंचनामा देखील केला जात नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे वाळू माफियांना मोकळे रान मिळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी प्रशासनाने तातडीने कारवाई करून रस्ते सुरक्षित करावेत, वाळू वाहतुकीवर नियंत्रण आणावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात आणखी गंभीर दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 151500

22 Ct सोने 91.60% : ₹. 139400

18 Ct सोने 75.00% : ₹. 115200

शुद्ध चांदी 999%:₹. 2480/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed