संत सखाराम महाराजांच्या जयघोषात अमळनेरचा रथोत्सव उत्साहात; सामाजिक ऐक्याचे दर्शन..

0
New-Doc-04-28-2026-06.40.jpg


आबिद शेख/अमळनेर
संत सखाराम महाराजांच्या जयघोषात आणि वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय वातावरणात अमळनेर शहरातील पारंपरिक रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. बारा बलुतेदारांच्या सहभागातून सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश देणारा हा रथोत्सव यंदाही भक्तिभावाने साजरा करण्यात आला.


रथोत्सवाची सुरुवात अभय देव व आरती देव यांच्या हस्ते रथपूजनाने झाली. त्यानंतर हभप प्रसाद महाराज यांनी विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात विधिवत पूजा करून लालजींची मूर्ती रथावर विराजमान केली. विशेष म्हणजे, सलीम बेलदार या मुस्लिम बांधवाला पहिली मोगरी लावण्याचा मान देण्यात आला, ज्यामुळे धार्मिक सलोखा आणि एकात्मतेचे दर्शन घडले.


रथामध्ये संत सखाराम महाराजांचा मुखवटा व पादुका, विठ्ठल-रुख्मिणी, संत ज्ञानेश्वर, मुक्ताई, तुकाराम महाराज यांच्या प्रतिमा सजवण्यात आल्या होत्या. यासोबत गरुड, हनुमान, नगारखाना, घोडेस्वार, मशालधारी, भालदार-चोपदार यांचा समावेश होता. ढोल-ताशांच्या गजरात, टाळकरी व वारकरींच्या “ज्ञानोबा माऊली”च्या जयघोषात रथ मिरवणूक जल्लोषात काढण्यात आली.
हभप प्रसाद महाराज यांच्या हस्ते विश्वस्त, पदाधिकारी व मान्यवरांना प्रसाद वितरण करण्यात आले. सुरुवातीला काही अंतर रथ दोराने ओढण्यात आला, त्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने मिरवणुकीस पुढे नेण्यात आले.पोलिस प्रशासनाने बंदोबस्त चोख ठेवले होते.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 151500

22 Ct सोने 91.60% : ₹. 139400

18 Ct सोने 75.00% : ₹. 115200

शुद्ध चांदी 999%:₹. 2480/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed