अमळनेरच्या डी.आर. कन्या शाळेचा एनएमएमएस परीक्षेत उज्ज्वल यश; गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार..

0
New-Doc-04-28-2026-07.05.jpg


आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : येथील खा. शि. मंडळ संचलित द्रौपदी रा. कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी मानाच्या एनएमएमएस (NMMS) परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यंदा तब्बल सहा विद्यार्थिनींनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेचा लौकिक उंचावला आहे.


मोक्षदा भूषण पाटील, मयुरी संदीप पाटील, ऐश्वर्या अजय पाटील, रोहिणी बाळू शिरसाठ, वैष्णवी महारू पाटील व केतकी पंकज देशपांडे या विद्यार्थिनींनी या परीक्षेत यश मिळवले. त्यांच्या या यशाबद्दल शाळेत विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.


या प्रसंगी शालेय समितीचे चेअरमन भाऊसो जितेंद्रजी जैन यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा सत्कार करून त्यांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, उपमुख्याध्यापिका श्रीमती एस. पी. बाविस्कर, पर्यवेक्षक श्री एस. पी. वाघ, ज्येष्ठ शिक्षक श्री एस. एस. माळी, श्री एस. एस. वाघ, ज्येष्ठ लिपिक श्री शाम पवार, श्री के. आर. बाविस्कर, श्रीमती आर. एस. सोनवणे तसेच परीक्षेच्या प्रमुख श्रीमती तरन्नुम शेख यांची उपस्थिती होती.
यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 151500

22 Ct सोने 91.60% : ₹. 139400

18 Ct सोने 75.00% : ₹. 115200

शुद्ध चांदी 999%:₹. 2480/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed