अमळनेरकरांसाठी जनगणना २०२७ ‘स्व-गणना’ सुविधा १ मेपासून सुरू; १००% सहभागाचे नगरपरिषदेकडून आवाहन..

0
New-Doc-04-28-2026-06.23.jpg


आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – भारत सरकारच्या गृह मंत्रालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘जनगणना २०२७’ प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याला लवकरच सुरुवात होत असून, यंदा प्रथमच नागरिकांसाठी घरबसल्या माहिती नोंदवण्याची डिजिटल ‘स्व-गणना’

(Self-Enumeration) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात ही सुविधा १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत सुरू राहणार असून, अमळनेर शहरातील नागरिकांनी या उपक्रमात १०० टक्के सहभाग नोंदवावा, असे आवाहन अमळनेर नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.
‘आमची जनगणना, आमचा विकास’ या अभियानांतर्गत घरसूची व गृहगणनेचे काम पार पडणार आहे. नागरिकांचा वेळ वाचावा तसेच माहिती अचूक पद्धतीने संकलित व्हावी, या उद्देशाने ‘स्व-गणना’ सुविधा सुरू करण्यात आली आहे.


नागरिकांनी se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्या मोबाईल क्रमांकाच्या OTPद्वारे लॉग-इन करायचे आहे. त्यानंतर राज्य, जिल्हा आणि अमळनेर शहराची माहिती निवडून डिजिटल नकाशावर घराचे स्थान निश्चित करावे लागेल. कुटुंबाची सर्व माहिती भरल्यानंतर ‘SE ID’ तयार होईल. हा SE ID जतन करून ठेवणे आवश्यक असून, १६ मे ते १४ जून या कालावधीत नगरपरिषदेचे प्रगणक घरोघरी भेट देतील तेव्हा केवळ हा SE ID दाखविल्यास प्रत्यक्ष सर्वेक्षणाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
दरम्यान, जे नागरिक ऑनलाइन ‘स्व-गणना’ करू शकणार नाहीत, त्यांच्या घरी प्रगणक प्रत्यक्ष भेट देऊन माहिती संकलित करतील. नागरिकांनी दिलेली सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असून ती कायद्याने संरक्षित असेल.
शहराच्या पुढील दशकाच्या विकासाचे नियोजन, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि निधीचे वाटप हे जनगणनेच्या आकडेवारीवर अवलंबून असते. त्यामुळे ‘मी प्रगती आहे, मी विकास आहे’ या संदेशाला प्रतिसाद देत अमळनेरकरांनी १ मेपासून सुरू होणाऱ्या ‘स्व-गणना’ प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 151500

22 Ct सोने 91.60% : ₹. 139400

18 Ct सोने 75.00% : ₹. 115200

शुद्ध चांदी 999%:₹. 2480/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed