नंदुरबारात अखिलेश शुक्ला यांचा काँग्रेस सेवा दिला तर्फे जंगी सत्कार..
24 प्राईम न्यूज 27 एप्रिल 2026
नंदुरबार – संघटन सुदृढीकरण अभियानाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या निरीक्षक म्हणून नई दिल्ली येथील अखिलेशजी शुक्ला (राष्ट्रीय उपाध्यक्ष, अखिल भारतीय किसान काँग्रेस) यांचे नंदुरबारात आगमन झाले.
यावेळी शहरातील विधान इंटरनॅशनल हॉटेल येथे नंदुरबार जिल्हा काँग्रेस सेवा दलातर्फे त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष एजाज भाई बागवान यांनी गुलाब पुष्पगुच्छ देऊन शुक्ला यांचा सन्मान केला.
या प्रसंगी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ व वरिष्ठ काँग्रेस पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. संघटन बळकटीसाठी मार्गदर्शन करताना शुक्ला यांनी पक्ष अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.
