शब्बीर अन्सारी यांच्या निधनानंतर नंदुरबारात मशिदींमध्ये कुराण पठन व दुआ..

0
New-Doc-04-27-2026-09.54.jpg


24 प्राईम न्यूज 27 एप्रिल 2026
ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांच्या निधनामुळे नंदुरबार शहरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मरणार्थ पवित्र शुक्रवारी नमाजानंतर शहरातील सर्व मशिदींमध्ये प्रार्थना, दुआ तसेच मदरशांमध्ये कुराण पठन करण्यात आले.


शब्बीर अन्सारी यांनी देशभरात मुस्लिम ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने लढा दिला होता. विविध परिषदांचे आयोजन करून त्यांनी ओबीसी प्रश्न राष्ट्रीय स्तरावर मांडले. मोर्चे, धरणे, आमरण उपोषण व जेलभरो आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी शासनाचे लक्ष वेधले होते. अभ्यासू आणि लढवय्ये नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती.


त्यांच्या निधनामुळे मुस्लिम ओबीसी चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या स्मरणार्थ ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष एजाज बागवान यांच्या पुढाकाराने शहरात विशेष दुआ व कुराण पठनाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी हाजी इस्माईल खाटीक, हाजी असलम चौधरी, नईम आझाद, शाकीर बागवान, शकील शाह, शकील खतिब, नासीर बागवान, जाकीर बागवान, सईद कुरेशी, अब्दुल सत्तार, जाकीर शाह, आरिफ मोमीन, सईद अन्सारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed