मोहिनी एकादशी रथोत्सव आज. : जातीय सलोख्याचे दर्शन घडवणारा सोहळा..

0
New-Doc-04-26-2026-23.39.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : मोहिनी एकादशी निमित्त आज रोजी होणारा पारंपरिक रथोत्सव यंदाही शहरात भक्तिरसाबरोबरच जातीय सलोख्याचे सुंदर दर्शन घडवणार आहे. विविध समाज, धर्म आणि घटक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत असल्याने अमळनेरची एकात्मतेची परंपरा पुन्हा अधोरेखित होत आहे.


भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी यंदाही रथ ओढण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करण्यात येणार आहे. मागील वर्षापासून लागू झालेल्या या निर्णयाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
रथोत्सवातील परंपरा कायम ठेवण्यात आली असून विविध समाजांना दिले जाणारे मान, मिरवणुकीचा मार्ग, वेळापत्रक आणि पानसुपारीचे कार्यक्रम यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे पारंपरिक स्वरूप अबाधित ठेवत आधुनिक सुरक्षेची जोड देण्यात आली आहे.
सायंकाळी ६ वाजता वाडी संस्थान येथे रथाचे विधिवत पूजन होईल. त्यानंतर सराफ बाजार, फरशी पूल, पैलाड मार्गे मिरवणूक काढण्यात येईल. रात्रभर चालणारी ही मिरवणूक दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा वाडी संस्थानात दाखल होईल.
हा रथोत्सव केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक ऐक्य, बंधुता आणि जातीय सलोख्याचा संदेश देणारा उत्सव म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे यंदाही मोठ्या संख्येने भाविक सहभागी होऊन एकात्मतेचा संदेश देणार आहेत.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 152000

22 Ct सोने 91.60% : ₹. 139800

18 Ct सोने 75.00% : ₹. 115500

शुद्ध चांदी 999%:₹. 2480/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed