तुर्कीत दाऊदच्या ड्रग्ज नेटवर्कला धक्का; सलीम डोला पोलिसांच्या ताब्यात.

0
New-Doc-04-26-2026-07.00.jpg


24 प्राईम न्यूज 26 एप्रिल 2026
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या अमली पदार्थ तस्करीच्या जाळ्याला मोठा धक्का बसला असून त्याचा विश्वासू सहकारी सलीम डोला (५८) याला तुर्कियेतील इस्तंबूल येथे स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कराचीमध्ये बसून कारभार पाहणाऱ्या दाऊदसाठी ही मोठी धडक कारवाई मानली जात आहे. मात्र, डोलाचे भारतात प्रत्यार्पण होईल की नाही याबाबत अद्यापही साशंकता व्यक्त केली जात आहे.


केंद्रीय अन्वेषण विभागाने जारी केलेल्या इंटरपोल अलर्टनंतर ही कारवाई करण्यात आली. सलीम डोला हा दाऊदच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्कमधील महत्त्वाचा दुवा मानला जातो. त्याच्याकडे या संपूर्ण रॅकेटची गोपनीय माहिती असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याची भारतात चौकशी झाल्यास अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.


यापूर्वी सांगलीतील एका कारखान्यावर टाकलेल्या छाप्यात सुमारे २५० कोटी रुपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. त्या प्रकरणानंतर डोला फरार होता. त्याच्याकडे पाकिस्तानी पासपोर्ट असल्याने तो पाकिस्तानमध्ये मुक्तपणे वावरत असल्याची माहिती समोर आली होती. तसेच, बॉलिवूडमधील काही कलाकारांनाही ड्रग्ज पुरवठा केल्याचेही तपासात उघड झाले आहे.
दरम्यान, तुर्की आणि पाकिस्तानमधील घनिष्ठ संबंध लक्षात घेता डोलाच्या प्रत्यार्पणाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तुर्की सरकार या प्रकरणात कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 152000

22 Ct सोने 91.60% : ₹. 139800

18 Ct सोने 75.00% : ₹. 115500

शुद्ध चांदी 999%:₹. 2480/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed