शिरपूरचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’ ठरतोय आदर्श; शेती, शिक्षण व उद्योग विकासावर भर – आमदार अमरीशभाई पटेल.

0
New-Doc-04-26-2026-06.29.jpg


24 प्राईम न्यूज 26 एप्रिल 2026
ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी शेती, आरोग्य आणि रोजगार या तिन्ही क्षेत्रांत समन्वयाने काम करणे अत्यावश्यक असून त्यातूनच सर्वांगीण विकास साधता येतो, असे प्रतिपादन भाजपचे आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले. शिरपूर तालुका सध्या राज्यात विकासाच्या नव्या वाटेवर पुढे जात असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.


ते पुढे म्हणाले की, नगराध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शिरपूरच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. विशेषतः जलसंधारणाच्या प्रभावी कामांमुळे तालुक्यात मोठा बदल घडून आला आहे. एकूण ४७५ बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली असून, त्यामुळे सुमारे १ लाख एकर जमीन सिंचनाखाली आली आहे. या जलव्यवस्थापनामुळे कृषी क्षेत्रात मोठी क्रांती घडून आली असून, यंदा तब्बल २ कोटी ८२ लाख केळीच्या रोपांची लागवड होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


शिक्षणाच्या बाबतीतही शिरपूर तालुका पुढे येत असल्याचे सांगताना पटेल म्हणाले की, येथील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन पुण्यासारख्या शहरांमध्ये आयटी क्षेत्रात नोकऱ्या करत आहेत. गरिबी दूर करण्यासाठी सर्वसामान्यांच्या मुलांनी शिक्षित होणे आणि स्वतःच्या पायावर उभे राहणे आवश्यक आहे. यासाठी दर्जेदार शिक्षणाला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिरपूर तालुक्याने शेती आणि पाणी व्यवस्थापनात ‘महाराष्ट्र पॅटर्न’ निर्माण केल्याचा दावा करत, पुढील टप्प्यात औद्योगिक विकासावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आयटी पार्क आणि औद्योगिक वसाहती उभारल्यास स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले. यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 152000

22 Ct सोने 91.60% : ₹. 139800

18 Ct सोने 75.00% : ₹. 115500

शुद्ध चांदी 999%:₹. 2480/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed