अमळनेरमध्ये गुटखा विक्रीवर कारवाई; पान सेंटरवर छापा, विक्रेता ताब्यात..

0
New-Doc-04-24-2026-06.58.jpg

अमळनेर /आबिद शेख शहरातील मातृछाया पान सेंटरवर अन्न सुरक्षा विभागाने धडक कारवाई करत राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची विक्री उघडकीस आणली आहे. या कारवाईत सुमारे ३ हजार ९११ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित विक्रेत्याला ताब्यात घेण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अन्न सुरक्षा अधिकारी आकाश कैलास बीऱ्हाडे यांनी दि. २१ रोजी सानेनगर तांबेपुरा येथील बळवंत भगवान पाटील यांच्या पान सेंटरवर छापा टाकला. या वेळी विविध कंपन्यांचा राज्यात बंदी असलेला गुटखा विक्रीसाठी ठेवलेला आढळून आला.


याप्रकरणी जप्त केलेला गुटखा ताब्यात घेण्यात आला असून आरोपीविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरात अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed