साने गुरुजी कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी षदी फीरोज पठान विराजमान.

0
New-Doc-04-22-2026-23.12.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – पूज्य साने गुरुजी अमळनेर नगर परिषद कर्मचारी पत सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी षदी फीरोज पठान यांची निवड करण्यात आली असून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारत चेअरमनपदी विराजमान झाले आहेत.

या निवडीमुळे संस्थेच्या कार्यात नवचैतन्य येईल, अशी अपेक्षा सभासदांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या वेळी झालेल्या बैठकीत सभासद बाबा देशमुख, सोमचंद संदानशिव, प्रमोद लटपटे, ईश्वरलाल पाटील, सलीम पठान, गणेश बोरोले, मनोज शर्मा, पूजा उपासनी आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी नवनिर्वाचित चेअरमन षदी फीरोज पठान यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


चेअरमन पद स्वीकारल्यानंतर षदी फीरोज पठान यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी पारदर्शक व सर्वसमावेशक कारभार करण्याचा निर्धार व्यक्त केला. सभासदांच्या हिताला प्राधान्य देत पतसंस्थेचा विकास साधण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या निवडीमुळे पतसंस्थेच्या कार्यात गती येऊन सभासदांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed