विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा उत्सव : पातोंडा येथे कला व कार्यानुभव प्रदर्शन उत्साहात संपन्न..
आबिद शेख/ अमळनेर
जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा, पातोंडा येथे विद्यार्थी निर्मित कला व कार्यानुभव प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा, पातोंडा येथील मुख्याध्यापिका सौ. सुनीता प्रदीप लोहारे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी सौ. प्रियंका शिंदे, सौ. वैशाली सोनवणे, श्रीमती सुषमा तायडे, सौ. छाया इसे तसेच श्री. स्वप्नील शिंदे आणि सागर भोई यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कलात्मक वस्तू, आकर्षक हस्तकला साहित्य तसेच कार्यानुभवावर आधारित प्रकल्प सादर केले. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पकता, कौशल्य आणि सर्जनशीलतेचा उत्कृष्ट आविष्कार पाहायला मिळाला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे मनापासून कौतुक केले.
यावेळी मुख्याध्यापिका सौ. सुनीता लोहारे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे असून यामुळे त्यांच्या कलात्मकतेला योग्य व्यासपीठ मिळते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीमती सुषमा तायडे व सौ. छाया इसे यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना वाव मिळाला असून शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांना नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र दिसून आले.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 152700
22 Ct सोने 91.60% : ₹. 140500
18 Ct सोने 75.00% : ₹. 116100
शुद्ध चांदी 999%:₹. 2530/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
