अमळनेरमध्ये कचरा वेचकांसाठी विशेष कार्यशाळा; स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत क्षमता बांधणी उपक्रम..
अमळनेर /आबिद शेख
स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत क्षमता बांधणी घटकाच्या माध्यमातून अमळनेर नगर परिषद हद्दीतील कचरा वेचकांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन मंगळवार, दि. २२ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आले. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) आणि अमळनेर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा पार पडली.
ही कार्यशाळा इंदिरा गांधी भवन येथे दुपारी २ ते सायं. ५.३० या वेळेत मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे तसेच नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेत शहरातील घंटागाडी द्वारे दररोज कचरा संकलन करणारे चालक व मदतनीस, घनकचरा प्रक्रिया केंद्रावरील कर्मचारी तसेच सुपरवायजर यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प्रशिक्षणासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनालयामार्फत नियुक्त त्रयस्थ संस्था ‘कुशाग्र फाऊंडेशन’च्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत केंद्र सरकारच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

यात नमस्ते योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM), ई-श्रम कार्ड, आधार कार्ड, बचत गट स्थापना, घनकचरा व्यवस्थापनातून उपलब्ध होणाऱ्या नव्या रोजगार संधी तसेच RRR केंद्र याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
कचरा वेचक आणि त्यांच्या कुटुंबियांचे जीवनमान उंचावणे, आर्थिक प्रगती साधणे आणि स्वावलंबन वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. यासोबतच जागतिक पृथ्वी दिनानिमित्त उपस्थितांना घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरणीय बदल याबाबत माहिती देऊन ‘हरित शपथ’ देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी कचरा वेचकांना सहभाग प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी स्वच्छता निरीक्षक श्री. संतोष जाधव, श्री. किरण कंडारे, शहर समन्वयक श्री. गणेश गढरी, कुशाग्र फाऊंडेशनचे अधिकारी श्री. देवेंद्र केळोदे, श्री. मुकेश चव्हाण, श्री. प्रज्ज्वल शेवलकर, युनुस शेख, अनंत संदानशिव, जया सरदार, तसेच घनकचरा सुपरवायजर श्री. खलील शहा आणि श्री. राजेंद्र गोलहीत आदी उपस्थित होते.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 152500
22 Ct सोने 91.60% : ₹. 140300
18 Ct सोने 75.00% : ₹. 115900
शुद्ध चांदी 999%:₹. 2520/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
