अवघ्या २४ तासांत खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा; दोन आरोपी जेरबंद..

0
New-Doc-04-21-2026-22.30.jpg

आबिद शेख/ अमळनेर
चोपडा शहरात घडलेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उलगडा करत दोन आरोपींना अटक केली आहे. या जलद कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.


दि. १९ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९.०० ते २० एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजेदरम्यान चोपडा-धरणगाव रस्त्यावर पाटचारीजवळ प्रदीप राजेंद्र महाजन (वय ३३, रा. तारामती नगर, चोपडा) यांचा अज्ञात हत्याराने डोके व चेहरा ठेचून खून करण्यात आला होता. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात CCTNS क्र. १५२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.


तपासादरम्यान, चेतन सुभाष कानडे यांच्या सांगण्यावरून विजय भास्कर वैदकर (रा. भाग्योदय नगर, चोपडा) व निर्मल संजय बडगुजर (रा. चिंच चौक, चोपडा) यांनी संगनमताने पूर्वीच्या वैमनस्यातून हा खून केल्याचे निष्पन्न झाले. गुन्हा केल्यानंतर आरोपी तात्काळ फरार झाले होते.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी मुंबईकडे पळाल्याचा माग काढला. त्यानुसार पोलिसांचे विशेष पथक मुंबईकडे रवाना झाले. दरम्यान, आरोपी दादर येथून जळगावकडे रेल्वेने निघाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नाशिक येथून रेल्वेत चढून शोधमोहीम राबवली. अखेर नाशिक ते चाळीसगाव दरम्यान चालत्या रेल्वेतच दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
अटक केल्यानंतर सुरुवातीला आरोपींनी गुन्ह्याची कबुली देण्यास टाळाटाळ केली. मात्र, पोलिसांनी विश्वासात घेऊन केलेल्या कसून चौकशीत त्यांनी पूर्व वैमनस्यातून खून केल्याची कबुली दिली.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोउनि. सोपान गोरे, पोउनि. जितेंद्र वल्टे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली.
या धाडसी आणि जलद कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण झाला आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 152700

22 Ct सोने 91.60% : ₹. 140500

18 Ct सोने 75.00% : ₹. 116100

शुद्ध चांदी 999%:₹. 2530/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed