राज्यभर सरकारी कर्मचारी, शिक्षकांचा बेमुदत संप सुरू; १७ लाख कर्मचाऱ्यांचा सहभाग.

0
New-Doc-04-21-2026-09.58.jpg


24 प्राईम न्यूज 21 एप्रिल 2026
राज्यातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी, जिल्हा परिषद तसेच शिक्षक-शिक्षकेतर अशा सुमारे १७ लाख कर्मचाऱ्यांनी आज, मंगळवारपासून बेमुदत संपाला सुरुवात केली आहे. कर्मचारी संघटना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने या संपाचा परिणाम राज्यातील शासकीय कामकाजासह रुग्णसेवेवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


दरम्यान, संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे. तरीही कर्मचारी संघटना आपल्या मागण्यांबाबत ठाम असल्याचे दिसून येत आहे.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस व संप समन्वयक विश्वास काटकर यांनी सोमवारी सांगितले की, “सरकारने आमच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी कोणताही ठोस पुढाकार घेतलेला नाही.

त्यामुळे आम्ही बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.”
तसेच, डिसेंबर महिन्यात झालेल्या नागपूर अधिवेशनात सरकारने १५ दिवसांत मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने कर्मचारी वर्गात नाराजीचे वातावरण आहे.
 या पार्श्वभूमीवर राज्यातील शासकीय कार्यालये, शाळा, तसेच आरोग्य सेवा यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून, सर्वसामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 152700

22 Ct सोने 91.60% : ₹. 140500

18 Ct सोने 75.00% : ₹. 116100

शुद्ध चांदी 999%:₹. 2530/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed