भरदिवसा घरफोडीने मूडी गाव हादरले; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह..

0
New-Doc-04-21-2026-09.40.jpg


अमळनेर /आबिद शेख
अमळनेर तालुक्यातील मूडी गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात खळबळ उडाली आहे. गाय माता मंदिर परिसरातील अन्नपूर्णाबाई बडगुजर यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि घरातील सुमारे पाच हजार रुपयांची रोकड लंपास केली. तसेच घरातील वस्तूंची तोडफोड करून मोठे नुकसानही करण्यात आले.


ही घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली. घराचे कुलूप तुटलेले आणि सामान अस्ताव्यस्त पडलेले पाहून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक माहितीनुसार चोरट्यांनी रोकड घेऊन पसार झाल्याचे समोर आले आहे.
विशेष बाब म्हणजे, मूडी गावात यापूर्वी अशा प्रकारच्या घटना क्वचितच घडल्या असल्याने अचानक झालेल्या या चोरीने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.


घटनेनंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत गावातील सुरक्षा व्यवस्था तातडीने मजबूत करण्याची मागणी केली आहे. विशेषतः रस्त्यावरील बंद दिवे त्वरित सुरू करणे, रात्रीची गस्त वाढवणे यावर भर देण्यात येत आहे. अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी ही घटना घडवली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, पोलिस प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने तपास सुरू करावा आणि गावात सुरक्षा वाढवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
मूडी गावातील ही घटना ग्रामीण भागातील वाढत्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणारा इशारा ठरत आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 152700

22 Ct सोने 91.60% : ₹. 140500

18 Ct सोने 75.00% : ₹. 116100

शुद्ध चांदी 999%:₹. 2530/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed