अमळनेर नगरपरिषदेत खळबळ; बनावट कागदपत्रांवर गुन्हा दाखल होणार?

0
New-Doc-04-20-2026-20.35.jpg


अमळनेर /आबिद शेख
अमळनेर नगरपरिषदेतील बनावट कागदपत्रांच्या गंभीर आरोपांमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून मुख्याधिकाऱ्यांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल का करू नये, याबाबत खुलासा मागवण्यात आला आहे. या प्रकरणी तक्रारदार राजकुमार छाजेड यांनी थेट आरोप करत कारवाईची मागणी केली आहे.


प्राप्त माहितीनुसार, मोहन बाळाजी सातपुते यांच्या नगरसेवक अपात्रता प्रकरणात जिल्हाधिकारी, जळगाव यांना खोटा अहवाल सादर करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच उच्च न्यायालयात दाखल रिट पिटीशन क्रमांक 7/2015/14 मध्येही बेकायदेशीर व नियमबाह्य अॅफिडेव्हीट सादर केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ही बाब कर्तव्यात कसूर व दखलपात्र गुन्हा असल्याचे छाजेड यांनी स्पष्ट केले आहे.


तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, या संदर्भात जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांनी आदेश देऊनही संबंधितांनी कोणतीही दुरुस्ती केली नाही. वारंवार लेखी व प्रत्यक्ष पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याशिवाय, काही व्यक्तींकडून दबाव टाकून खोटी कागदपत्रे तयार करण्यात येत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव (नगर विकास शाखा) यांनी या तक्रारीची दखल घेत मुख्याधिकाऱ्यांना तात्काळ चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे अमळनेर नगरपरिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 152700

22 Ct सोने 91.60% : ₹. 140500

18 Ct सोने 75.00% : ₹. 116100

शुद्ध चांदी 999%:₹. 2530/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed