१० मिनिटांत उरकली पालिकेची सभा; “लोकशाहीचा गळा घोटला” – शहर विकास आघाडीचा गंभीर आरोप..

0
New-Doc-04-20-2026-20.35.jpg


अमळनेर/ आबिद शेख
अमळनेर नगरपरिषदेची दिनांक २० एप्रिल रोजी झालेली सर्वसाधारण सभा अवघ्या १० मिनिटांत कोणतीही सविस्तर चर्चा न करता आटोपण्यात आल्याचा गंभीर आरोप विरोधी गटातील शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी केला आहे

. या प्रकारामुळे शहराच्या राजकारणात खळबळ उडाली असून, हा “पूर्वनियोजित खेळ” असून “लोकशाहीची गळचेपी” झाल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.
नगरसेवकांनी दिलेल्या माहितीनुसार, सभेच्या अजेंड्यावर तब्बल २७ विषयांचा समावेश होता. यामध्ये शहराच्या विकासाशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे होते. मात्र सभा सुरू होताच कोणतीही चर्चा न करता ती घाईघाईने संपवण्यात आली. विशेष म्हणजे, शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांना एकही मुद्दा मांडण्याची संधी न देता थेट सभा संपल्याची घोषणा करण्यात आली आणि सर्व विषय सत्ताधाऱ्यांच्या “बहुमताने” मंजूर झाल्याचा दावा करण्यात आला.


यामुळे “हे सर्व आधीच ठरवूनच केले होते का?” असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. “जनतेचे प्रश्न दडपण्यासाठीच सभा १० मिनिटांत गुंडाळली गेली,” असा आरोप करत “नगरसेवकांना बोलू दिलं नाही, म्हणजे लोकशाहीला कुलूप लावलं,” अशा शब्दांत संताप व्यक्त करण्यात आला.
या घडामोडींमुळे सभागृहात काही काळ गोंधळाचे आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अनेक नगरसेवकांनी हा प्रकार “लोकशाहीचा उघड अपमान” असल्याचे सांगत प्रशासनावर जोरदार टीका केली.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर अद्याप प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहर विकास आघाडी व अपक्ष नगरसेवकांकडून करण्यात आली आहे.
या मागणीसाठी नगरसेवक राजू फाफोरेकर, भरतकुमार ललवाणी, देवेंद्र कांबळे, सचिन पाटील, सौ. स्वप्ना विक्रांत पाटील, योगिता सयाजीराव कापडणे, अफसाना मुक्तार खाटीक, जुबेदाबी हाजी नसीर, कविता विजय राजपूत, शोभाबाई गढरे, नंदाताई नरेंद्र संदानशिव, विजय कहारु पाटील आदींनी आवाज उठवला आहे. सभेतील घाईगडबडीच्या निर्णयांमुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 152700

22 Ct सोने 91.60% : ₹. 140500

18 Ct सोने 75.00% : ₹. 116100

शुद्ध चांदी 999%:₹. 2530/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed