जळगाव LCB ची मोठी कारवाई : गावठी पिस्तूलसह दोन आरोपी जेरबंद..
जळगाव / प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात बेकायदेशीर अग्निशस्त्रांच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई करत दोन आरोपींना गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात संभाव्य गुन्हेगारी कृत्य रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.yd

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील समाजकंटकांवर लक्ष ठेवून कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, उमर्टी गावाकडून कृष्णापूर मार्गे मामलदे होते चोपड्याकडे दोन संशयित इसम मोटारसायकलवरून गावठी पिस्तूल घेऊन जात आहेत.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत उमर्टी परिसरात संशयित मोटारसायकल (हिरो होंडा, क्र. MH-19-S-9450) अडवून त्यावरील दोन इसमांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपली नावे राहुल कुवरसिंग पावरा (वय २२, रा. उमर्टी, ता. चोपडा, जि. जळगाव) व गणपत प्रभाकर किर्तने (वय २८, रा. असोला जवळ बाजार, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) अशी सांगितली.
पंचांसमक्ष तपासणी केली असता आरोपींकडून एक गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, एक मोटारसायकल व दोन मोबाईल फोन असा एकूण सुमारे ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र. नं. ५९/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियम कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पोलीस हवालदार विष्णू बिन्हाडे, दिपक माळी, रवींद्र पाटील, विलेश सोनवणे तसेच पोलीस अंमलदार रावसाहेब पाटील यांचा समावेश होता.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 152700
22 Ct सोने 91.60% : ₹. 140500
18 Ct सोने 75.00% : ₹. 116100
शुद्ध चांदी 999%:₹. 2530/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
