अमळनेर स्मार्ट बाजारात पर्स चोरी; सीसीटीव्ही फुटेजवरून ‘खो-खो’, पोलिसांचा कसून तपास सुरू..

0
New-Doc-04-20-2026-06.41.jpg


आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर शहरातील स्मार्ट बाजार परिसरात एका महिलेची पर्स चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. संबंधित महिला या अमळनेरचे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांच्या भावाची पत्नी असल्याने या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.


घटनेनंतर अमळनेर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यात आली आहे. मात्र, रिलायन्स मॉल व्यवस्थापनाकडून फुटेज देण्यास टाळाटाळ होत असल्याचे समजते. संबंधित फुटेज मुंबई येथे असल्याचे कारण देत मॉल प्रशासनाकडून स्पष्ट सहकार्य मिळत नसल्याची चर्चा आहे. पोलिसांकडूनही याबाबत पाठपुरावा सुरू असून, तरीही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले जात आहे.


दरम्यान, या प्रकरणात ‘खो वर खो’ सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. पोलिसांनी घटनेचा छडा लावण्यासाठी विविध अंगांनी तपास सुरू ठेवला असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेमुळे शहरात सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, व्यापारी संकुलांमधील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed