अक्षय तृतीया निमित्त पोदार स्कूलचा विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याचा संदेश..
अमळनेर /आबिद शेख अक्षय तृतीया या पवित्र सणाच्या निमित्ताने पोदार स्कूल, अमळनेर तर्फे सर्व विद्यार्थी, पालक आणि शाळेच्या कुटुंबीयांना मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या.

शाळेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या संदेशात नमूद करण्यात आले आहे की, अक्षय तृतीया हा सण नव्या सुरुवातींचा, सकारात्मक विचारांचा आणि अखंड प्रगतीचा संदेश देणारा आहे.

या शुभदिनानिमित्त प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात ज्ञानाची भरभराट होऊन यशाची सातत्यपूर्ण वाटचाल घडावी व त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, अशी मनापासून इच्छा व्यक्त करण्यात आली.
तसेच, पालकांचे सहकार्य, विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिक्षकांची तळमळ यामुळेच पोदार स्कूलचे कुटुंब अधिक मजबूत व यशस्वी होत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
अक्षय तृतीया सर्वांच्या आयुष्यात आनंद, आरोग्य, समृद्धी आणि अखंड यश घेऊन येवो, अशी शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.
