अहिराणी संस्कृतीचा उत्सव : अमळनेरात आखाजी महोत्सव उत्साहात पार..

0
New-Doc-04-19-2026-07.10.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : खान्देशातील पारंपरिक आखाजी महोत्सवाला यंदा अमळनेर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अहिराणी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. प्रमुख वक्त्या प्रा. डॉ. योगिता पाटील यांनी आपल्या भाषणातून आखाजी सणाचे महत्त्व अहिराणी भाषेतून प्रभावीपणे मांडत उपस्थितांची मने जिंकली.


खान्देश साहित्य संघाच्या वतीने एलआयसी कॉलनी येथे आयोजित पहिल्या आखाजी महोत्सवाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात झाले. कार्यक्रमात भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी सांगितले की, आखाजी हा अहिराणी संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा सण असून गौराई, झोक्यावरची गाणी, जात्यावरची गाणी या परंपरा जतन करणे काळाची गरज आहे. या महोत्सवाला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे भविष्यात हा कार्यक्रम शासकीय स्तरावर अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी होते. आमदार अनिल पाटील यांनी महिलांनी आधुनिक काळातही पारंपरिक रूढी जपल्याबद्दल गौरव व्यक्त केला. माजी आमदार साहेबराव पाटील यांनीही अहिराणी शैलीत भाषण करत वातावरणात रंगत आणली.
प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष शरद धनगर यांनी केले, तर स्वागताध्यक्ष अशोक आधार पाटील यांनी स्वागतपर भाषण केले. यावेळी साहित्य संघाचे सचिव रमेश बोरसे, खजिनदार प्राचार्या रत्नाताई पाटील, ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील, कवी हिरामण कंखरे, गोकुळ बागुल, शाहीर नाना पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महोत्सवात पारंपरिक पद्धतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. पुरणपोळी, झोक्यावरची गाणी, उखाणे-वेशभूषा, आरास, जात्यावरची गाणी आणि चित्रकला अशा स्पर्धांमध्ये सहभागी स्पर्धकांनी उत्साहाने भाग घेतला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्थानिक पदाधिकारी, नागरिक आणि विविध संस्थांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन संजय पाटील आणि पूनम बेडसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उमेश काटे यांनी मानले.
एकंदरित, पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपणारा आणि अहिराणी भाषेचा गोडवा जिवंत ठेवणारा हा आखाजी महोत्सव अमळनेरकरांसाठी संस्मरणीय ठरला.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 153400

22 Ct सोने 91.60% : ₹. 141100

18 Ct सोने 75.00% : ₹. 116600

शुद्ध चांदी 999%:₹. 2540/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed