अमळनेर पोलीसांचा सन्मान सोहळा : धाडसी,कर्तव्यदक्ष, कामगिरीबद्दल कर्मचाऱ्यांचा गौरव..

0
New-Doc-04-18-2026-18.30.jpg


अमळनेर / आबिद शेख
अमळनेर पोलीस स्टेशनमधील धाडसी, कर्तव्यदक्ष व उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या सन्मान सोहळ्यामुळे संपूर्ण पोलीस दलात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातून संबंधित कर्मचाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पोलीस दलातील जबाबदारी पार पाडताना धैर्य, तत्परता आणि प्रामाणिकपणा दाखवत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी अमळनेर पोलीसांचे नाव उंचावले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविले.


सन्मानित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक श्री नामदेव बोरकर, पोलीस उपनिरीक्षक श्री शरद काकळीज, पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद सोनवणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील तेली, पोलीस कॉन्स्टेबल विनोद संदानशिव आणि पोलीस कॉन्स्टेबल नितीन मनोरे यांचा समावेश आहे.
या सन्मानामुळे इतर पोलीस कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत असून, सन्मानित कर्मचाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 153400

22 Ct सोने 91.60% : ₹. 141100

18 Ct सोने 75.00% : ₹. 116600

शुद्ध चांदी 999%:₹. 2540/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed