दुहेरी यशाचा सन्मान: अग्रवाल कुटुंबाचा अभिनंदन सोहळा..

0
New-Doc-04-19-2026-06.28.jpg

अमळनेर /आबिद शेख– श्रीमंत प्रतापशेठ चॅरिटेबल फाउंडेशन संचलित स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर यांच्या वतीने सीए श्री. राधेश्याम बजरंगलाल अग्रवाल व सीए कु. यशवी राधेश्याम अग्रवाल यांचा अभिनंदन व सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.


पुणे येथील ‘शिक्षण प्रसारक मंडळ’ या संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री. राधेश्याम अग्रवाल यांचा तर सीए फायनल परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल कु. यशवी अग्रवाल यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
अमळनेर येथील बन्सीलाल पॅलेस येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. चंद्रकांत जे. बडगुजर सर होते. प्रमुख वक्ते म्हणून मा. श्री. राजेशजी पांडे (सरचिटणीस, भाजप महाराष्ट्र प्रदेश) यांनी मार्गदर्शन केले.


कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून मा. सौ. स्मिताताई उदय वाघ (खासदार, जळगाव), मा. डॉ. बी. एस. पाटील (आमदार, अमळनेर), मा. दादासो. शिरीष हिरालाल चौधरी (माजी आमदार, अमळनेर), मा. अनिल भाईदास पाटील (आमदार, अमळनेर), मा. साहेबराव धोंडू पाटील (माजी आमदार, अमळनेर) तसेच मा. डॉ. परीक्षित बाविस्कर (नगराध्यक्ष, अमळनेर) आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
शनिवार, दि. १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता पार पडलेल्या या सोहळ्यात विविध मान्यवरांनी अग्रवाल पिता–कन्येच्या यशाचा गौरव करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 153400

22 Ct सोने 91.60% : ₹. 141100

18 Ct सोने 75.00% : ₹. 116600

शुद्ध चांदी 999%:₹. 2540/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed