मंगळवारपासून राज्यातील १७ लाख कर्मचारी-शिक्षक बेमुदत संपावर; सरकारला इशारा..

0
New-Doc-04-18-2026-08.34.jpg


आबिद शेख/ अमळनेर
राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली असून येत्या मंगळवार, २१ एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. कर्मचारी समन्वय समितीने शुक्रवारी याबाबत अधिकृत घोषणा केली.


सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, रिक्त पदांची तातडीने भरती, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे यासह एकूण १८ मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे राज्य सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे.
गेल्या वर्षभरात कर्मचाऱ्यांनी सात वेळा विविध आंदोलनांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याची दखल न घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे अखेर संपाचा निर्णय घेतल्याचे समन्वय समितीने स्पष्ट केले.


समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी सांगितले की, “निवृत्तीवेतनासंदर्भातील अधिसूचना दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. १ मार्च २०२४ नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अद्याप तात्पुरते निवृत्तीवेतनही मिळालेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा संताप वाढला आहे.”
दरम्यान, या संपाचा परिणाम शासकीय कार्यालयांसह शाळा, महाविद्यालये आणि आरोग्य सेवांवर होण्याची शक्यता असून, विशेषतः शाळांमधील परीक्षा व शासकीय कामकाज ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 152500

22 Ct सोने 91.60% : ₹. 140300

18 Ct सोने 75.00% : ₹. 115900

शुद्ध चांदी 999%:₹. 2520/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed