१००% निकालासह स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचा दबदबा कायम; विद्यार्थ्यांची उज्ज्वल कामगिरी…
अमळनेर /आबिद शेख
शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये मार्च महिन्यात झालेल्या इयत्ता दहावीच्या सीबीएसई परीक्षेत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेची गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. यंदाही शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत संस्थेचा शैक्षणिक दर्जा उंचावला आहे.

या परीक्षेत सिद्धी भानुदास पाटील हिने 96.6% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. चैतन्य वारके हिने 96.2% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर निशा पाटील व मानसी पाटील यांनी प्रत्येकी 95.8% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.

एकूण 40 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 11 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण मिळवले असून 19 विद्यार्थ्यांनी 85% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत. विशेष म्हणजे सर्व विद्यार्थी विशेष प्राविण्यसहित उत्कृष्ट श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
या घवघवीत यशाबद्दल शाळेचे मार्गदर्शक बजरंगजी अग्रवाल, संस्थापक अध्यक्ष नीरज अग्रवाल, अध्यक्षा सौ. सीतिका अग्रवाल, व्यवस्थापन सदस्या ममता अग्रवाल, आचल अग्रवाल, चेअरमन डी.डी. पाटील सर तसेच मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
शाळेतील शिक्षकांनी नियमित सराव परीक्षा, वैयक्तिक मार्गदर्शन व शिस्तबद्ध अभ्यास पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची भक्कम तयारी करून घेतल्यामुळेच हे यश शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. पालकांनीही शाळेच्या शैक्षणिक पद्धतीचे व शिक्षकांच्या अथक परिश्रमाचे कौतुक व्यक्त करत समाधान व्यक्त केले.
या उल्लेखनीय निकालामुळे स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलने अमळनेरमध्ये पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध केला आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 153500
22 Ct सोने 91.60% : ₹. 141200
18 Ct सोने 75.00% : ₹. 117000
शुद्ध चांदी 999%:₹. 2530/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
