आमदार अनिल पाटील यांचा पानंद रस्त्यांवर फोकस; टँकर प्रस्तावांना ४ दिवसांत मंजुरीचे आदेश…

0
New-Doc-04-17-2026-23.29.jpg


अमळनेर /आबिद शेख
तालुक्यातील विकासकामांना गती देण्यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना अंतर्गत महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या पानंद रस्त्यांच्या कामांचा सखोल आढावा घेण्यात आला


बैठकीदरम्यान आगामी उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवरही गंभीर चर्चा करण्यात आली. नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश आमदार पाटील यांनी प्रशासनाला दिले. विशेषतः टँकर मागणी संदर्भातील प्राप्त तसेच नव्याने येणाऱ्या सर्व प्रस्तावांना केवळ चार दिवसांच्या आत मंजुरी देण्याचे स्पष्ट आदेश देत कामकाजात गती आणण्यावर भर देण्यात आला. या निर्णयामुळे शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.


या बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कामांचा आढावा सादर केला. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी, बांधकाम, भूमी अभिलेख, पोलीस प्रशासन तसेच पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी समन्वयातून कामे जलदगतीने पूर्ण करण्यावर एकमत व्यक्त केले.
तसेच समिती सदस्य व ग्रामस्थ प्रतिनिधींनी आपल्या भागातील अडचणी मांडल्या. त्यावर आमदारांनी सकारात्मक भूमिका घेत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, डॉ. उल्हास देवरे, गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, विजयकुमार देवरे, भूषण कदम, नीना बाविस्कर, वैशाली जडे, आकाश भाई, एस. एस. खर्डे, डी. जी. जाधव, प्रकाश चव्हाण, महेश जाधव, ए. जे. परदेशी, जितेंद्र बुवा, वाय. ए. वंजारी, ए. आर. कोठावदे, एस. पी. गावित, एस. बी. देसले, एम. डी. चव्हाण, एच. के. पाटील, पी. ए. पाटील, गांगुर्डे साहेब, एस. व्ही. पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.
याशिवाय समिती सदस्य अनिल सिसोदे, रिता बाविस्कर, गौरव उदय पाटील, चेतन काशिनाथ पाटील तसेच ग्रामस्थ प्रतिनिधी महारु आत्माराम पाटील, सुरेश देवचंद पाटील, ललित भूपेंद्र बाविस्कर आदींची उपस्थिती होती.
एकूणच, शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पाणीटंचाईवर मात आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दृष्टीने ही बैठक फलदायी ठरल्याचे दिसून आले.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 152500

22 Ct सोने 91.60% : ₹. 140300

18 Ct सोने 75.00% : ₹. 115900

शुद्ध चांदी 999%:₹. 2520/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed